|| मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा ||
चैत पुनवेची रात आज आलीय भरात
धडधड काळजात माझ्या माईंना
कदि कवा कुठं कसा जीव झाला येडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली कि मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतिच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राय सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटू कवातरी साजणा
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा
कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय जास्त, दाजी हिला भेटा कि येत्या बाजरी
सहाची बी गाडी गेली नावाची बी गाडी गेली
आता बाराचीबी गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा
येण्यावाणी रुतो माझ उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात
नादावलं खुलपीस कबुतर हे माझ्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट हि चांदण्याची
उगा घाई कशापाई हाय नजर उभ्या गावाची
शेत आला राखणीला राघू झालं गोळा
शील घाली आडून कोणी करून तिरपा डोळा
आता कसा किती झाकू सांगा कुठवर राखू
राया भान माझं मला र्हाईना
मला जाऊ द्या ना घरी,आता वाजले कि बारा
कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय जास्त, दाजी हिला भेटा कि येत्या बाजरी
सहाची बी गाडी गेली नावाची बी गाडी गेली
आता बाराचीबी गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा
आला पाड झाला भार भरली उभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळिंब व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरणा
आडोशाच्या खोडीचा मी कसा गुपित राखू कळना
मोरावानी दौल माझा मैनेवानी तोरा
औन्दाच्या ग वर्साला मी गाठलं वय सोळा
जीव लागलीय गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताची हि तुमची र्हाऊद्या
मला जाऊद्या ना घरी,आता वाजले कि बारा
कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय जास्त, दाजी हिला भेटा कि येत्या बाजरी
सहाची बी गाडी गेली नावाची बी गाडी गेली
आता बाराचीबी गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा
|गीतकार : गुरु ठाकूर | संगीतकार : अजय अतुल | गायक : बेला शेंडे | चित्रपट : नटरंग |
|गीतप्रकार : चित्रगीत, लावणी |
0 Comments