।। आदिमाय आंबाबाई ।।
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
तीचया एक दर्शनात कोटी जन्माची पुण्याई
उदे ग अंबाबाइ , उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते
तीच संहारप्रहारी दैत्यदानाव मारितें
उग्रचण्डी रूपाआड जारा वात्सल्याचा गाई
क्षेत्र नामवंतांची एक त्याचे नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी उभे राहिले मंदिर
नाना देव ते भोवती देवी मधोमध राही
तुळजापूरची भवानी जणू मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी
स्वतःला तरली, भक्तांची स्वये तारुनिया नेई
अमरावतीची देवता शाश्वत , अमर
अंबेजोगाईत तिने एक मांदीयले घर
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई
कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी
दुर्गा घुर्गत यमाई, आंबा असुरमर्दानी
किती रूपे, किती नावे पेरी तेज एक वाही
। गीतकार : सुधीर मोघे । संगीतकार : सुधीर फडके । गायक : आशा भोसले।
। चित्रपट : थोरली जाऊ । गीतप्रकार : भक्तीगीत । आरती संग्रह : अंबाबाई ।
0 Comments