।। आत्ताच बया का बावरलं ।।
हळद पिवळी पोर कवळी, जपून लावा गाली
सावळ्याच्या चाहुलीनं पार धावली झाली
गाजर झाला दारी, साजनाची स्वारी
साजनाची स्वारी आली लाज गाली आली
जपून होत ठिवलं मन ह्यो कधीच न्हाइ झुरल
उधळलं ग समद बाई हातात न्हाई उरल
जीव जडला पर न्हाई नजरला कळलं
किती नडल जिकिरीनं मागं ना सरल
आत्ताच बया का बावरलं
खरंच बया का घाबरलं ..
साद तू घातली, रान पेटून आली
कावरीबावरी लाज दाटून आली
पहिल गुमान बाई, घेतल दमनं बाई
चेतलं तुफान साजणा
बेभान झाले साजणा
नजरला नजरच, नजरेनं कळलं
मन इवालं इरघळलं
अन नातं जुळलं
आताच बया का बावरल
खरंच बया का घाबरल ...
मन झालं धुंद, बाजिन्दा, ललकारी ग
पिर्तीचा गंध, आनंद, नवलाई ग
लागली ओढ, मन हे लै द्वाड
सतवुन झाल समदा ग्वाड
लागलं साजणीला साजनाचं याड
झालीया भूल हि उमजली या मनाला
परतुनी घाव हा लागला रं जीवाला
डोळे झाकलेलं बाई, रेघ आखलेल बाई
माग रोखल्यालं साजणा
उधळून गेली साजणा
हरलया परिमाला, परिमान जिंकल
झगडून मन माझे अदबीनं झुकला
साजना तू सावरल...
। गीतकार : अजय- अतुल । संगीतकार : अजय-अतुल । गायक : श्रेया घोषाल ।
। चित्रपट : सैराट । गीतप्रकार : चित्रगीत ।
0 Comments