।। आनंद पोटात माझ्या माईना ।।
हे माझे पात्र त्या धन्याला , वैकुंठवासी रहातो तयाला
पत्राचा मजकूर वाचूनी पहिला, भक्तसंकटी धावुनी आला
हि वेडिवाकुडी सेवा माझी मान्य करुनि प्रभू घेतील काय
आणि अज्ञान मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील काय
हे तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही
आणि तुझे भजना तूच करून घे अरे कलावण मी नाही
कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय
आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पिता एक माय
दत्त दर्शनाला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
(आता लगीच काय? लगीच लगीच )
दत्त दर्शनाला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
(आम्ही येणार !)
अरे आनंद पोटात माझ्या ... अरे वडिला ?
अरे आनंद पोटात माझ्या.. औदुंबर ? नरसोबाची वाडी राहिलीये
अरे आनंद पोटात माझ्या.. अरे बाबा गाणगापूर (हा तिकडंच जाऊया आपलं !)
अरे आनंद पोटात माझ्या माईना ना रे माईना
आनंद पोटात माझ्या माईना
गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट
या या डोळ्यांची भूक काही जाईना
अरे आनंद पोटात माझ्या माईन
रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर
नजरेस आणिक काही येईना
अरे आनंद पोटात माझ्या माईना
नजरबंदीचा हा खेळ खेळ सुदगुरू प्रेमळ
खळे खेळीता खेळ पुरा होईना
अरे आनंद पोटात माझ्या माईना
हरीबाज पांडुरंग दत्त गरुडी अभंग
या या भजनाची हौस पुरी होईना
अरे आनंद पोटात माझ्या माईना
। गीतकार : ---। संगीतकार : --- । गायक : ---।
। चित्रपट : झुंज । गीतप्रकार : भक्तीगीत ।
0 Comments