।। आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या ।।
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमना
कसा जीवच लागना
बोलघेवडी साळुंकी
कसा शब्द हि बोलना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा
चांदण्याची हि रात
रात जुळे सुनी सुनी
निळ्या असमानी तळ्यात
लाख रुतल्या ग गवळणी
दूर लांबल्या वाटेल रुखरुख टेहळणी
दूर गेले घरधनी बाई दूर गेले धनी
। गीतकार : ना. धो. मनोहर ।
। संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर ।
। गायक : लता मंगेशकर ।
0 Comments