ads

Anupamaye Ho Suru Yudha He Ramravanache Lyrics। अनुपमेय हो सुरु युद्ध हे रामरावाणांचे

।। अनुपमेय हो सुरु युद्ध हे रामरावाणांचे  ।। 
 
Anupamaye Ho Suru Yudha He Ramravanache Lyrics। अनुपमेय हो सुरु युद्ध हे रामरावाणांचे

नभा भेदूनि नाद चालले शंख दुदूभीचे 
अनुपमेय हो सुरु युद्ध हे रामरावाणांचे

सशंख राक्षसगन तो दिसला 
कृष्णधनांवर बलाकमला 
मुखांतूनि शत गर्जे चपला 
रणांगणावर कोसळले तों पाऊस बाणांचे 

नाचत थय थय खिंकाळीत हय 
गजगर्जित करी नादसमन्वय 
भीषणता ती जणू नादमय 
त्या नादांतच मिळले पदरव प्लवंग राक्षसांचे 

दांत दाबुनी निज अधारांवर 
वानरताडन करिती निशाचर 
नभात उडती सदेह वानर 
शस्त्र म्हणुनी ते घाव घालिती  वृक्ष पर्वतांचे 

"जय दाशरथी, जय तारासूंत"
प्रहार करिती वानर गर्जत 
झेलीत शस्त्रां अथवा हाणित 
भरास आले द्वंद जणू  महासागराचे 

गदा, शूळ वा लागूंनी शक्ती 
राक्षस वानर घेती मुक्ती 
रणात पडती अपुल्या रक्ती 
'जय लंकाधीश ' घोष घुमवीत अरी वानरांचे 

द्वीप कोसळे, पडला घोडा 
वर बाणांचा सडा वांकडा 
'हाण मारा, ठोका तोडा '
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे 

रणात मारता आनंदाने 
मांसकर्दमी फुलती वंदने 
तीही तुडवली जाती चरणे 
रणभूमीवर ओहोळ सुटले लाल शोणिताचे 

कलेवरावर पदे कलेवर 
ऋक्ष,निशाचर, नकळे वानर 
मरणाहूनही शौर्य भयंकर 
कैक योजने उडुनी जाती  अवयवांचे 

चक्रे, चरणे,हस्त, लांगुले 
शुंडा, ग्रीवा,शिरे , पाऊले 
पडले ते शतखंडित झाले 
प्रळयकाळसे अंग थरारे धराणि गगनाचे 

 द्वंद तरी हो कुठे कुणाचे 
काळमूखातून कोणी वांचे 
कुठे कुणाचे  कबंध  वांचे 
धुमाळीत त्या कोना नुरले भानच कोणाचे 

 । गीतकार : ग.दि. माडगूळकर ।  
 । संगीतकार : सुधीर फडके ।  
 । गायक : सुधीर फडके ।  

Post a Comment

0 Comments