ads

Ivaleivale jeevahi yeti mothya mothya kamala Lyrics। इवलेइवले जीवही येति मोठ्या मोठ्या कामाला

 ।। इवलेइवले जीवही येति मोठ्या मोठ्या कामाला  ।।  

Ivaleivale jeevahi yeti mothya mothya kamala Lyrics। इवलेइवले जीवही येति मोठ्या मोठ्या कामाला

लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला 
इवलेइवले जीवही येति मोठ्या मोठ्या कामाला !

महा भयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला 
एक छोटासा उंदीर आला ,
सिन्हाच्या अंगावर चढूनि ओढी दाढी मिशाला !
सिंह जगाला करीत गर्जना धरिला उंदीर त्याने ,
म्हणे चिमुरड्या, " तुला फाडतो माझ्या ह्या पंज्याने "
थरथर कापे, उंदीर सांगे, "येईन कधीतरी कमला !"
इवलेइवले जीवाहियेति मोठ्या मोठ्या कमला !

( थरथर कपणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला .)
तो म्हणाला, अरे मूर्खा तू माझ्या एका घासाचाही नाहीस !
चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कमी येणार आहेस रे ?
चल,चालत हो इथून ."
 उंदीर बिळात पळून गेला.पण एकदा काय झाले ठाऊक आहे का .)

कधी एकदा सिंह अडकला फासुनिया जाळ्यात 
वनराजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यात !
हादरे जंगल, अशी गर्जना ऐकून उंदीर धावे 
सिंहली तो सांगे, " आता माझे शौर्य बघावे !
भिऊ नका हो, रडू नका हो, सोडवितो तुम्हाला.
नका लोचनी आणू पाणी, पाळीन मी वाचनाला ."
सर्व शक्तीने कुरतडूनिया उंदीर तोंडी जाळे 
पाहून सारे मग सिंहाचे भरून आले डोळे !
जीव चिमुकला संकटकाळी अखेर कामी आला 
इवलेइवले जीव कितीदा येति मोठ्या कामाला !

 । गीतकार : शांताराम नांदगावकर ।  
 । संगीतकार : सी. रामचंद्र ।  
 । गायक : सी. रामचंद्र ।  

Post a Comment

0 Comments