ads

Ivalyaivalya valucha Lyrics। इवल्याइवल्या वाळूचं

 ।। इवल्याइवल्या वाळूचं ।।  

Ivalyaivalya valucha Lyrics। इवल्याइवल्या वाळूचं

इवलाईवाल्या वाळूचं 
हे तर घर बाळूचं 
बाळू होता बोटभर 
झोप घेई पोटभर 
वरती बाळू 
खाली बाळू 
बाळू म्हणे कि, " इथेच लोळू "
उन्हात तापू लागले वाळू 
बाळूला ती लागे पोळू 
या इवल्याशा खोपेत 
बाळू रडला झोपेत !

एक वन होते वेळूचं 
त्यात घर होत साळूचं 
साळू मोठी मायाळू 
वेळू लगे आंदोळू 
त्या पंख्याच्या वाऱ्यात 
बाळू निजला तोऱ्यात !
एकदा पाऊस लागे वोळु 
भिजली वाळू ,भिजले वेळू 
नदीला येऊ लागले पूर 
बाळू आपला डाराडूर 


भुर्रकन खाली आली साळू 
आणि म्हणाली, उठा रे बाळू 
बाळू निजला जैसा धोंडा 
तोवर आला मोठा लोंढा 
साळुन मग केला काय ?
चोचीत धरला त्याचा पाय 
वेळूवरती नेले उंच 
आणि मंडला नावा प्रपंच 
बाळूच घरकुल वाहून गेलं 
साळूचं घरटं राहून गेलं !

साळू आहे मायाळू 
बाळू बेटा झोपाळू 
बाळू आणि वेळूवर 
ताणून देतो खालीवर 
साळू म्हणते,"गाऊ खेळु "
वाळू म्हणतो इथेच लोळू 
आमची गोष्ट आखडू 
संभ्याच्या पाठीत लाकडू .

  । गीतकार : ग. दि. माडगूळकर ।  
  । संगीतकार : सुधीर फडके ।  
  । गायक : सुधीर फडके ।  
  । चित्रपट : प्रपंच ।  

Post a Comment

0 Comments