।। इवल्याइवल्याशा टिकल्याटिकल्यांचे ।।
इवल्याइवल्याशा
टिकल्याटिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
एक मजा तर एक खरी !
निळी निळी वाट
निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळूझुळू पाट
निळ्यानिळ्या डोंगरात निळीनिळी दरी !
ऐक मजा तर ऐक खरी !
चांदीच्या झाडांनां सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी
ऐक मजा तर ऐक खरी !
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादि
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदोबा दिवा मोठा लावला वारी !
ऐक मजा तर ऐक खरी !
। गीतकार : ग. दि. माडगूळकर ।
। संगीतकार : पु. ल. देशपांडे ।
। गायक : आशा भोसले ।
। चित्रपट : देवबाप्पा ।

0 Comments