।। उंचनीच काही नेणें भगवंत ।।
उंचनीच काही नेणें भगवंत ।
तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ।।१।।
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी ।
दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी ।।२।।
चार्म रंगू लागले रोहिदासा सांगे ।
कबीराचे मागे विणी शेले ।।३।।
सजनकसाया विकू लागले मास ।
मला सावत्यास खरपु लागे ।।४।।
नरहरीसोनार घडो फुकू लागे ।
चोख्यामेळ्या संग ढोरें ओढी ।।५।।
नामयाच्या जणिसवे वेची शेणी ।
धर्मा घरी पाणी वाहे झाडी ।।६।।
नाम्यासवें जेवि नव्हे संकोचित ।
ज्ञानियांची भिंत अंगी ओढी ।।७।।
अर्जुनाची घोडी हाकी हा सारथी ।
भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ।।८।।
गौळियांचे घरी अंगे गाई वळी ।
द्वारपाळ बाली द्वारी जाला ।।९।।
याकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी ।
आंबऋषीचे सोशी गर्भवास ।।१०।।
मीराबाई साठी घेतो विषप्याला ।
दामाजीचा जाला पाडेवार ।११।।
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची ।
हुंडी मेहत्याची अंगे भरी ।।१२।।
पुंडलिकाची अजुनी तिष्ठत ।
तुका म्हणे मत धन्य त्याची ।।१३।।
। गीतकार : संत तुकाराम ।
। सांगितकार : स्नेहल भाटकर ।
। गायक : स्नेहल भाटकर ।
। चित्रपट : तुका झालासे कळस ।

0 Comments