।। कोण होतीस तू काय झालीस ।।
नारी जातीची थोरवी या दुनियेने गायिली
अनेक रूपे हि तुझी या दुनियेने पहिली
कोण होतीस तू,काय झालीस तू
आग वेडे कशी वाया गेलीस तू
सुंदर रूप तुझे निर्मळ भारी
होतीस अशी तू पवित्र नारी
डोईवर पदर, पदरात चेहेरा
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा
होती यशोदा तू, होतीस तारा तू
होतीस राधा तू, होतीस मीरा तू
पार्वती ती महान झाली
राजवैभव टाकून आली
काळ बदलला तू हि बदलली
साऱ्यांना भुलवित रस्त्याने चालली
पदराचभान नाही, अब्रूची जाण नाही
सडक लैला अशी बदनाम झालीस तू
तू अशी नारी होती, लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली होऊन लढलिस तू
कोण होतीस तू, काय झालीस तू
पुरुष जातीची थोरवी या दुनियेने गाईली
अनेक रूपे तुझीही याच दुनियेने पहिली
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
तेजस्वी रूप तुझे,करारी बाण
होतास असा तू मर्दाचा राणा
सिंहाची छाती होती, उरात आग होती
वाघाची झेप होती, डोळ्यात जाग होती
होतास राम तू होतास बुद्ध तू
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू
भगतसिंग तो महान झाला
देशाच्या क्रांतीसाठी फासला गेला
काळ बदलला, तुही बदलला
करीत इशारे तू रस्त्याने चालला
पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी
सडक मजून असा बदनाम झालास तू
तू असा शूर होतास , लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू
लाजवंती कालची तू चंचल छछोर होई
बेछूट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही
कोण होतीस तू , काय झालीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू
आखूड केस हे, आखूड कपडे
पाठ हि उघडी, पोट हे उघडे
कालची सीता आज डॅडीची रिटा झाली
साडी बिचारी खाली घसरली
नवा तुझा ढंग हा बघण्याजोगा
पुढून मुलगी मागून मुलगा
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू
तू अशी नारी होती लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू
काल तुझ्या हाती तलवार होती
लढवय्याचा तू वारसा
आज तुझ्या हाती कंगवा
घडीघडी बघसी तू आरसा
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
काय तुझी वेशभूषा आता कहर झाला
कालचा हिरो आज झिरो झाला
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका
लांबलांब केस हे मिशीला चटका
तर्हा तुझी बायकि, बघण्याजोगी
पुढून मुलगा हा मागून मुलगी
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू
तू असा शूर होता लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
। गीतकार : जगदीश खेबुडकर ।
। संगीतकार : राम कदम ।
। गायक : उषा मंगेशकर , चंद्रशेकर गाडगीळ ।
। चित्रपट : झुंज ।

0 Comments