ads

Kuthe Shodisi Rameshwar Kuthe Shodhisi Kashi Lyrics। कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधसी काशी

 ।। कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधसी काशी ।।  

Kuthe Shodisi Rameshwar Kuthe Shodhisi Kashi Lyrics। कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधसी काशी

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी 
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी 

झाड फुलांनी आले बाहेरून 
तू न पाहिले डोळे उघडून 
वर्षांकाळी पाऊसधारा 
तुला न दिसला त्यात इशारा 
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी 

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा 
लाविलेस तू भस्म कापळा 
कधी न घेऊन नांगर हाती 
पिकविलेस मातीतून मोती 
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी 

देव मॉल्ट बाळमुखातून 
देव डोलतो उंच पिकांतून 
कधी होऊनि देव भिकारी 
अन्नासाठी आर्ता पुकारि 
अवतीभवती असून दिसेना, शोधितोस आकाशी 

 । गीतकार : मंगेश पाडगावकर ।  
 । संगीतकार : यशवंत देव ।  
 । गायक : सुधीर फडके ।   

Post a Comment

0 Comments