।। कुत्ना थमाल ले थमाल आपुल्या गाई।।
कुत्ना थमाल ले थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपुल्या घलासी जातो भाई ।।१।।
तुम्ही थोलल्या पातलाचे लेक ।
तुम्हांमधले मी गलिब आहे एक ।
मदला म्हणता ले जाई गाई लाख ।
किती धावू ले कातां लागला पायी ।।२।।
काली पिवली ले गाय आहे तान्हेली ।
या या गवल्याची धावली गाय पालाली ।
मदला देखुनि तो गवली हाका माली ।
काली काम्बली हिलूनि घेतली थाली ।।३।।
काल बलाची ले बलाची खलवस केला ।
तुम्ही सल्वानी फाल फाल घेतला ।
मी गलिब ले म्हणुनी थोलका दिला ।
तू म्हणशील ले याला कालतीलच नाही ।। ४।।
। गीतकार : संत नामदेव ।
। संगीतकार : जितेंद्र कुलकर्णी ।
। गायक : सचिन पिळगावकर ।
। गायक : सचिन पिळगावकर ।

0 Comments