।। काय सामना करू तुझ्याशी ।।
हुकूमी पाळिता पुरुषजातीचा सरे जिंदगी सगळी ग
बाळपणी तुज धाक पित्याचा तरुणपणी तुला हवा पती
वृद्धपणी तव पुत्राहाती स्वतंत्र बुद्धी तुला किती ?
अरे नको वाढवणं सांगू शाहीरा पुरुषजातीचे फुकाफुकी
स्त्रीजातीच्या अकलेपुढती तुझी बढाई पडलं फिकी
सावित्रीच्या चतुरपणाने यमधर्माला दिला धडा
असेल ठावी कथा जरी ती, बोल मज पुढे धडाधडा !
आग तूच सांग ग, कोणासाठी सावित्री ते दिव्य करी
सावित्रीची कथा सांगते पुरुशप्रीतिची मातब्बरी !
पतीवाचूनि कसे जगावे हाच जियेला प्रश्न पडे
इथेच ठरला पुरुष श्रेष्ठ गे चतुर सारीक बोल पुढे !
पुरुषावाचुनी जन्मे नरी या पृथ्वीचा कोण पती ?
पित्यावाचुनी जन्मा आली काय थांबली तिची गती ?
अग अज्ञानाने नकोस बोलू आभाळाची सूट धरा
गती कशाची, सुर्यभावती फिरे नार ती गरागरा !
पुरुषासाठी नार जन्मते, पुरुषासाठी जन्म तिचा
वृक्षवाचुनी जन्म पांगळा फुलवणाऱ्या वेलीचा !
अरे सांग शाहीरा, नारीवाचून पुरुषही झाला कधी पुरा ?
पूर्ण शास्त्री धुंडून पाही, धुंद गगन कि वसुंधरा
तार्यामजी शुक्र नांदतो, वाऱ्यापाठी उभी हवा
पृथ्वीभवती चन्द्र फिरतसे वेष घेऊनि नवा नवा !
हवा कशाला कलह सांग हा अपसातला खुल्यापरी
हरजितीचा हौसच खोटी, तुझी नि माझी बरोबरी
। गीतकार : ग. दि. माडगूळकर ।
। संगीतकार : वसंत पवार ।
। गायक : आशा भोसले, शाहीर अमर शेख ।
। चित्रपट : वैजयंता ।
0 Comments