।। काय झाला सोनुलीला ।।
काय झाला सोनुलीला?
रडू कशाचा डोळ्यात ?
पोरक्या वासरावानी
कशापायी हा आकांत ?
डोळ्यातल्या आसवांच्या
पाणीदरशा मोत्यांनी
डवरले काहून ग !
लाल गुलाब हे दोन्ही
रडू नको ग देते
माझ्या बाईला भुलजाई
हसतील कशा मग
ओठांवर जाईजुई
जांभया कां देशी अशा
नीज आली कां मैनेला ?
झोप झोप छबुकडे !
मीच थोपटते तूला
मीच थोपटते तूला
ये ग ये ग हम्मा ये ग
दुदु दे ग तान्हुलीला
राघो ! पळत ये तुही रे
घाल वारा साळुंकीला
पाय हळूहळू टाका
गोड गोड ओव्या म्हणा
चार घेऊन तुम्ही या
टांगा मैनाई ! पाळणा
मीच निजविते त्यात
माझ्या जीवाची हि राणी
हिंडवते अन बाईला
गात गात गोड गाणी
। गीतकार : वि. भि. कोलते ।
। संगीतकार : व्ही. डी. अंभईकार ।
। गायक : व्ही. डी. अंभईकार।
0 Comments