ads

Ka Kalena Kontya Kshani Harvate Man Kase Lyrics | का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे

 ।। का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे ।।  

Ka Kalena Kontya Kshani Harvate Man Kase Lyrics | का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे?
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे ?
बांधा जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरींचे !

एक मी एक तू, शब्द मी गीत तू 
आकाश तू आभास तू साऱ्यात तू 
ध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू 
स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू 

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे 
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे ?
बांधा जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरींचे !

पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी, माझी तू कधी केव्हा कसे ?
जाळले बंध हे 
अबोल प्रीत हि नाते नवे !
अजब रीत हि स्वप्न नवे !
बांधा जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरींचे !

घडले कसे कधी, कळते न जे कधी 
हळुवार ते आले कसे ओठांवरी 
दे ना तू साथ दे, हातात हात दे 
नजरेला नजरेतूनि इकरार घे 

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे 
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे ?
बांधा जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरींचे !

 । गीतकार : सतीश राजवाडे, श्रीरंग गोडबोले ।  
 । संगीतकार : अविनाश विश्वजीत ।  
 । गायक  : बेला  शेंडे, स्वप्नील बांदोडकर ।  
 । चित्रपट : मुंबई पुणे मुंबई ।  

Post a Comment

0 Comments